Saturday, September 14, 2024
Homeमुख्य बातम्याढोल बडवणार्‍यांचा उच्छाद, त्याला काँग्रेसची साथ

ढोल बडवणार्‍यांचा उच्छाद, त्याला काँग्रेसची साथ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या एमजी रोडवरील काँग्रेस कमिटीच्या टेरेसवर सरावाच्या नावाखाली ढोल बडवणार्‍यांचा उच्छाद सुरु झाला असून, शहरातील पोलिस आयुक्त शिंदेंचा यावर कोणताही ‘अंकुश’ दिसून येत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत व्यवसायिक वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे समजते.

शहराची मुख्य बाजारपेठ एमजी रोडवरील काँग्रेस कमिटीच्या टेरेसवर ढोल बडवणार्‍यांचा उच्छाद सुरू झाला आहे. त्यातून ध्वनीप्रदूषण होत असून त्याचा नागरिकांना त्रास वाढलेला असताना मात्र याचा मागमूसही पोलिसांना नसावा हे आश्चर्य आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

केंद्रीय स्तरावर मोठमोठ्या रॅली काढून गोरगरिबांच्या प्रश्नावर सहानुभूती दर्शवणार्‍या काँग्रेस पक्षाने नाशिकमध्ये मात्र व्यापार्‍यांसह नागरिकांना वेठीस धरण्याची भूमिका घेतल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. भर बाजारपेठेत सायंकाळच्या व्यापार व्यवसायाच्या वेळेत हा ढोल बडवून मन:स्ताप देण्याचाच प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. शहर परिसरात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असताना केवळ एमजी रोडवर दररोज सायंकाळी गणेशात्सवासाठी ढोल वाजविण्याच्या सराव करण्याच्या निमित्ताने हेकेखोरीचे दर्शन घडवले जात असल्याचे चित्र आहे.

हा सराव महिनाभर चालण्याची शक्यता आहे. शहर प्रदूषणात धोकादायक पातळीवर आलेले आहे. त्यात शहरात वाढत असलेल्या ध्वनी प्रदूषणाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना याबाबत बेजबाबदारपणा दिसून येत आहे.‘खाकी’चा धाक हा फक्त सर्वसामान्यांंपुरताच आहे काय?असाही सूर उमटताना दिसून येत आहे.

सायंकाळी सुरू होणार्‍या ढोल बडवण्यातून परिसरातील व्यापारी त्रस्त झालेले आहेत. व्यवसायाच्या वेळात ग्राहकांशी संवाद साधणेही कठीण होत आहे. त्यासोबतच व्यायाम व खेळासाठी येणारे खेळाडू त्रस्त झालेले आहेत. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांची व कार्यालयातील कर्मचार्‍यांची एकाग्रता भंग होऊ लागली आहे.परिसरात असलेल्या दवाखान्यातील रुग्ण या ढोलच्या बडवण्यातून कडाडणार्‍या ध्वनी प्रदूषणाला वैतागलेले आहेत.

प्रत्यक्षात मुंबईसह महाराष्ट्रातही ढोल वादक सराव करताना दिसून येतात. मात्र नागरिकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी जागा दिली जाते, मग नाशिकला हे ढोल बडवणारे कुणालाही न जुमानता कोठेही सराव करत आहेत का?मात्र सामाजिक सेवेचे व्रत घेतलेल्या काँग्रेस कमिटीने जाणिवपूर्वक जागा देऊन व्यावसायीकांसह नागरिकांना त्रास होईल असे कृत्य केल्यामुळे व्यवसायिकांसह नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

नागरी वसाहतीत जनसामान्यांच्या स्वास्थ्याचा विचार न करता ढोल बडवणार्‍यांना शहराच्या बाहेर परवानगी देण्याची मागणी होत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी व पदाधिकार्‍यांना पत्र देऊन या प्रकाराला चाप लावण्याची मागणी करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या