मुंबई | Mumbai
आयपीएलच्या १३ व्या हंगामातील ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी केली. त्याने फक्त 21 चेंडूत 60 धावा केल्या. मात्र मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला. पण पराभवानंतरही हार्दिक पांड्या या सामन्यात चाहत्यांचं मन जिंकण्यात यशस्वी ठरला.
हार्दिक पांड्याने ‘ब्लॅक लाइव्स मॅटर’ आंदोलनाचं समर्थन करणारा पहिला आयपीएल खेळाडू आहे. हार्दित पांड्याने मैदानावरच आपले गुडघ्यावर बसत आंदोलनाचं समर्थन केलं. राजस्थान रॉयल्स विरोधात हार्दिक पांड्याने धमाकेदार खेळी केली होती. पांड्याने 19व्या ओव्हरमध्ये कार्कि त्यागीच्या चेंडूवर आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यनंतर लगेचच पांड्या ‘ब्लॅक लाइव्स मॅटर’ आंदोलनाचं समर्थन करण्यासाठी मैदानातच गुडघ्यांवर बसला. पांड्याने हा फोटो आपल्या सोशल मीडिया आकाउंट्सवर शेअर केला आहे. याआधी क्रीडा विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंनी आतापर्यंत या हॅशटॅगवर ट्विट केलं होतं. वर्णद्वेषाविरोधात असलेल्या या हॅशटॅगमुळे आता चर्चा होत आहे.
काय आहे ब्लॅक लाइव्स मॅटर ?
जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत मृत्यू झाला. पोलिसांनी जॉर्जच्या मानेवर तब्बल नऊ मिनिटं पाय ठेवला होता. परिणामी मानेवर पडलेल्या अतिरिक्त दाबामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा थेट संबंध अमेरिकेतील वर्णद्वेषाशी जोडला जात आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण अमेरिका पेटून उठली आहे. देशवासीयांनी करोना विषाणूची पर्वा न करता रस्त्यांवर येऊन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलनामध्ये अनेक मोठे कलाकार, सेलिब्रिटी, खेळाडू सामिल झाले आहोत.