दिल्ली | Delhi
श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी मंगळवारी हरिणी अमरसूर्या यांंनी श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान म्हणून शपथ दिली. हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या नवीन पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांनी मंगळवारी श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
दरम्यान, हरिणी अमरसूर्या या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांच्याआधी सिरिमावो भंडारनायके व त्यांची मुलगी चंद्रिका भंडारनायके कुमारतुंगा यांनी श्रीलंकेचं पंतप्रधानपद भूषवलं आहे. चंद्रिका कुमारतुंगा यांनी आधी पंतप्रधानपद व नंतर श्रीलंकेचं अध्यक्षपद सांभाळलं आहे.
हे ही वाचा : …असा झाला अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
हरिणी अमरसूर्या यांचं भारताशी खास कनेक्शन आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे. मंगळवारी श्रीलंकेच्या १६ व्या पंतप्रधान म्हणून शपथ घेणाऱ्या हरिनी यांनी ९० च्या दशकात दिल्लीतील प्रतिष्ठित हिंदू महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे. १९९१ ते १९९४ या काळात त्यांनी दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्र विषयातून पदवी मिळवली आहे. त्या या महाविद्यालयाच्या पहिल्या हेड ऑफ स्टेट देखील होत्या.
दरम्यान राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी स्वत:सह चार सदस्यांचे मंत्रिमंडळ नियुक्त केले आहे. हरिणी अमरसूर्या यांच्याकडे न्याय, शिक्षण, कामगार, उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य आणि गुंतवणूक या मंत्रालयांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
हे ही वाचा : किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी नॉमिनेट
तर ‘नॅशनल पीपल्स पॉवर’चे खासदार विजिता हेराथ आणि लक्ष्मण निपूर्णाची यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. संसद विसर्जित झाल्यानंतर ते काळजीवाहू कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहतील. तसेच, नोव्हेंबरच्या अखेरीस संसदीय निवडणुका होऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.