Wednesday, July 22, 2026
HomeनगरAkole : हरिश्चंद्र गडावर दरड कोसळली, चौेघे जखमी

Akole : हरिश्चंद्र गडावर दरड कोसळली, चौेघे जखमी

जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू

अकोले |प्रतिनिधी| Akole

हरिश्चंद्र गडावर काल रविवार सुट्टी असल्यामुळे पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. पावसाची झिमझिम चालूच असताना मालाड येथील दहा पर्यटक हरिश्चंद्रगडावरून खाली उतरत असताना आडव्या कड्याच्या मागील बाजूस पर्यटकांच्या अंगावर दगड व माती येऊन चार पर्यटक गंभीररित्या जखमी झाले आहेत. दोन पर्यटक मातीच्या व दगडांच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले होते. पर्यटकांच्या संरक्षणासाठी बांधलेल्या रेलिंगमुळे पर्यटकांना आधार मिळाला. सोबत असलेल्या पर्यटकांनी व तेथे उपस्थित असलेल्या अमोल बादड या ग्रामस्थाने तात्काळ माहिती गावात व वन्यजीव विभागाला दिली.

- Advertisement -

घटनास्थळी तात्काळ गावकर्‍यांनी धाव घेऊन पर्यटकांच्या मदतीने माती व दगडाखालून पर्यटकांना बाहेर काढले व लगेच उचलून पायथ्याशी आणून खाजगी गाडीने पर्यटकांना राजुर दवाखान्यात पाठवले. रस्त्यात मिळालेल्या 108 क्रमांकाच्या गाडीने राजूरला दवाखान्यात आणले गेले. दवाखान्यात डॉक्टर अभिनव लहामटे यांनी प्रथम उपचार करून या जखमी पर्यटकांना नाशिक येथे हलवण्याचा सल्ला दिला. चार जखमींमध्ये राम प्रकाश यादव, निलेश गोमाटी, विश्वकर्मा, कृष्णा कुमार साहू, दिनेश संजय साहू यांचा समावेश असून त्यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेचे वृत्त कळताच सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार, वनक्षेत्रपाल दत्तात्रय पडवळे, लांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना मदत करून त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : आषाढ सरींचे तांडव सुरू; भंडारदरा ‘एवढे’ टक्के भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात काल मंगळवारी दुपारपासून आषाढसरींनी तांडव नृत्य करण्यास सुरूवात केल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरण...