मुंबई । Mumbai
छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कबरीवरुन (Aurangzeb Kabar) राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. बजरंग दलाने (Bajrang Dal) ही कबर हटवण्याची मागणी केली आहे.
दुसरीकडे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे मिलिंद एकबोटे यांनी ही कबर नष्ट करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता सरकारने औरंगजेबच्या कबरीवर सुरक्षा वाढवली आहे. हे प्रकरण तापलेले असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत. ते धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची भाषा करत आहेत याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे. क्रूर प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो, हे त्या ठिकाणी दिसून येते, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सपकाळ यांनी टीका केली आहे रत्नागिरी दौऱ्यावर असताना आज ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांना काँग्रेसकडून बदनाम करत असली ची टीका मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली होती या टिकेचाही हर्षवर्धन सकपाळ यांनी समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे, तुम्ही राजीनामा द्यावा अशी मागणी करत तुम्ही ज्या पक्षात आहात तो पक्ष शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात आहे. तुम्ही या पक्षात राहू नये, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनावले आहे.