Tuesday, April 1, 2025
Homeमहाराष्ट्र‘आशा’ वर्करना कौशल्यपूर्ण प्रशिक्षणासाठी हॉर्वड विद्यापीठ मदत करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

‘आशा’ वर्करना कौशल्यपूर्ण प्रशिक्षणासाठी हॉर्वड विद्यापीठ मदत करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. २८: राज्यातील प्राथमिक आरोग्य सेवेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, ‘आशा’ वर्करना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण हॉर्वड विद्यापाठीच्या माध्यमातून देण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली.

सामान्यांना गुणवत्तापूर्ण व जलद अशी आरोग्य सेवा देण्यासाठी विशेषत: ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला जात आहे. विभागाचा पदभार स्विकारल्यानंतर आरोग्यमंत्री टोपे यांनी पहिल्या बैठकीत प्राथमिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत उपकेंद्रांचे आरोग्यवर्धीनी केंद्रात रुपांतर करून सामान्यांना आरोग्य सुविधा देण्याचे नियोजन केले.

- Advertisement -

आरोग्य विभागाच्या रुग्णालयांचे जाळे ग्रामीण भागात जास्त आहे. तेथे तंत्रज्ञानाच्या वापर करीत अत्याधुनिक उपचार सुविधा देता याव्यात यासाठी विभाग प्रयत्नशील असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दुर्गम भागात तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यास शहरातील नामांकीत डॉक्टरांचा सल्ला त्याद्वारे रुग्णांना देता येईल का, याबाबत हॉर्वड विद्यापीठाच्या माध्यमातून कशी मदत करता येईल याविषयी आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

ग्रामीण भागात आरोग्यसेवेसाठी ‘आशा’ कार्यकर्ती मोठा दुवा ठरत आहेत. त्यांचा माध्यमातून लसीकरण, गर्भवती महिलांची काळजी, बालकांचे आरोग्य याक्षेत्रात प्राथमिक स्तरावरचे काम करण्यात येते. आशा कार्यकर्तींच्या या कामाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांना कौशल्यपूर्ण विशेष प्रशिक्षण देण्यात यावे. त्यासाठी हॉर्वड विद्यापीठ, वुई स्कुल यांनी पुढकार घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

बैठकीस हॉर्वड विद्यापीठाचे प्रा. राजीव गुप्ता, वुई स्कुलचे समुह संचालक उदय साळुंके, वुई स्कुलचे आरोग्यनिगा विभागाचे सहायक अधिष्ठाता डॉ. भगवती प्रसाद आदी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : सात ते नऊ वाजेदरम्यान सोनसाखळी चोरी; महिलावर्गात भितीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक शहरात (Nashik City) पुन्हा एकदा भिवंडी, नाशिक, श्रीरामपूर व आंबिवलीतून आलेल्या सराईत चेनस्नॅचर्सने (Chainsnatchers) नाशिककर महिलांच्या (Woman) उरात धडकी...