Thursday, October 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजHaryana and J&K Elections Results 2024 : हरियाणात भाजपची तर जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया...

Haryana and J&K Elections Results 2024 : हरियाणात भाजपची तर जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीची मुसंडी

नवी दिल्ली | New Delhi

आज सकाळी ८ वाजेपासून हरियाणा आणि जम्मू-काश्मीर (Haryana and Jammu and Kashmir) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) मतमोजणीस सुरुवात झाली आहे. यातील हरियाणात मतमोजणीच्या सुरुवातीच्या तासाभरात काँग्रेस पक्षाने ६० जागांवर आघाडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेस पक्ष हरियाणात सत्ता स्थापन करणार, असे संकेत मिळत होते. मात्र, त्यानंतर तासाभरात पुन्हा एकदा याठिकाणी काँग्रेस पिछाडीवर येतांना पाहायला मिळाली. तर जम्मू-काश्मीरमध्ये सुरुवातीपासूनच इंडिया आघाडी आघाडीवर दिसत आहे. मात्र, यातही मोठ्या प्रमाणावर उलटफेर होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) ताज्या आकडेवारीनुसार सध्या हरियाणात काँग्रेस (Congress) ३४ आणि भाजप (BJP) ५० जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय लोक दल १, बहुजन समाज पक्ष १ आणि अपक्ष उमेदवार ४ जागांवर आघाडीवर आहेत. यात सध्याच्या कलानुसार तरी हरियाणात भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. पंरतु, हा आकडा कधीही बदलू शकतो. त्यामुळे हरियाणात काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सध्या निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार इंडिया आघाडी ४८ जागांवर आघाडीवर आहे. यात जम्मू काश्मीर नशनल कॉन्फरस ४१, काँग्रेस १० जागांवर आघडीवर आहे. तर भाजप २६ जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय पीडीपी ५, जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरस २, सीपीआयएम १ आणि अपक्ष ७ जागांवर आघाडीवर आहेत. मात्र, हे आकडे मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधीही बदलू शकतात. त्यामुळे या राज्यात नेमकी कुणाची सत्ता स्थापन होते, हे बघणे महत्वाचे असणार आहे.

दरम्यान, हरियाणात सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कलानुसार, काँग्रेसला ४०.५० टक्के मत पडली आहेत. तर भाजपला ३८.७० टक्के मते मिळाली आहेत. तर जुलाना विधानसभा मतदारसंघातून १५ पैकी सातव्या फेरीत कुस्तीपटू विनेश फोगट ३८ मतांनी आघाडीवर आहे. विनेश फोगाटला ३० हजार ३०३ आणि भाजपचे उमेदवार योगेश कुमार यांना ३० हजार २६५ मते मिळाली आहेत. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला आघाडीवर असून पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्तींची मुलगी पिछाडीवर आहे. याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष देखील पिछाडीवर आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या