Saturday, November 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजHaryana and Jammu-Kashmir Elections Results : हरियाणात भाजपचा तर जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचा...

Haryana and Jammu-Kashmir Elections Results : हरियाणात भाजपचा तर जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचा विजय; कुणाला मिळाल्या सर्वाधिक जागा?

नवी दिल्ली | New Delhi

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी (Haryana and Jammu and Kashmir Assembly Elections) काही दिवसांपूर्वी मतदान पार पडले होते.यात हरियाणाच्या ९० जागांसाठी एकाच टप्प्यात म्हणजे ५ ऑक्टोबरला मतदान झाले होते.तर जम्मू-काश्मीरच्या विधानसभेच्या ९० जागांसाठी पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबरला,दुसऱ्या टप्प्यात २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यात ०१ ऑक्टोबरला मतदान झाले होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Haryana Election Result 2024 : विनेश फोगाटने विधानसभेचं मैदान मारलं; मिळविला दणदणीत विजय

निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, हरियाणातील ९० जागांपैकी भाजपला ४८, काँग्रेसला ३७,भारतीय नॅशनल लोकदल २ आणि अपक्ष उमेदवार दोन जागांवर विजयी झाले आहेत. तर जम्मू-काश्मीरमधील ९० पैकी जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सला ४२, भाजपला २९,काँग्रेसला ६, जम्मू-काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ३,जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआयएम) १, आम आदमी पक्ष १, आणि अपक्षांना ७ जागा मिळाल्या आहेत.

हे देखील वाचा : J&K Election Result 2024 : भाजपला मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांचा पराभव

दरम्यान, हरियाणात एकूण ६७.९ टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये ६३.४५ टक्के इतके मतदान झाले होते. त्यानंतर आज या दोन्ही राज्यांचा निकाल जाहीर झाला. यात हरियाणात भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये फारूक अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने (Congress) बहुमताचा आकडा पार केला. यानंतर आता या राज्यांत पुढील काही दिवसांत नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या