Saturday, November 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजHaryana Election Result 2024 : हरियाणात काँग्रेसची पिछेहाट; भाजपाने बहुमताचा आकडा केला...

Haryana Election Result 2024 : हरियाणात काँग्रेसची पिछेहाट; भाजपाने बहुमताचा आकडा केला पार

नवी दिल्ली | New Delhi

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये (Haryana and Jammu and Kashmir) विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले होते. त्यानंतर आज या दोन्ही निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत, त्यासाठी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. यात हरियाणात सुरुवातीच्या कलांमध्ये सकाळी काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेढे आणि जिलेबी वाटत जल्लोष करण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर तासाभरात पुन्हा एकदा याठिकाणी काँग्रेस पिछाडीवर येतांना पाहायला मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून सुरू केलेला जल्लोष थांबविला. तर आता भाजपने जल्लोष करण्यास सुरुवात केली असून संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Haryana and J&K Elections Results 2024 : हरियाणात भाजपची तर जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीची मुसंडी

निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार,हरियाणात सध्या भाजप ५० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर असून एका जागेवर त्यांचा उमेदवार विजयी झाला आहे. तसेच भारतीय लोक दल १, बहुजन समाज पक्ष १ आणि अपक्ष उमेदवार ४ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे मतमोजणीच्या शेवटपर्यंत या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणावर उलटफेर होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : J&K Election Result 2024 : मेहबुबा मुफ्ती यांच्या मुलीने स्वीकारला पराभव; एक्सवर केली पोस्ट

तसेच मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले की, हरियाणात भाजपा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार असल्याचा मला विश्वास आहे. आम्ही १० वर्षात बरीच विकासकामे केली आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सुरू केलेल्या विकासकामांना चालना दिली,असे त्यांनी म्हटले. तर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की,“आम्ही अजूनही आशावादी आहोत. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ माहिती अपडेट करत नाही. तीच माहिती वापरून माध्यमे बातम्या देत आहेत. पण आमच्या कार्यकर्त्यांकडून जी माहिती मिळत आहे, त्यानुसार आम्ही पुढे आहोत”,असे त्यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या