Thursday, October 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजHaryana Election Result 2024 : विनेश फोगाटने विधानसभेचं मैदान मारलं; मिळविला दणदणीत...

Haryana Election Result 2024 : विनेश फोगाटने विधानसभेचं मैदान मारलं; मिळविला दणदणीत विजय

नवी दिल्ली | New Delhi

कुस्तीच्या मैदानातून राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला आहे. हरियाणाच्या (Haryana) जुलाना मतदारसंघातून काँग्रेसने विनेश फोगाटला उमेदवारी दिली होती. भाजपचे (BJP) उमेदवार योगेश कुमार यांचा तिने पराभव केला आहे. काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवलेल्या विनेश फोगाटला ६५ हजार ०८० मते मिळाली आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Haryana and J&K Elections Results 2024 : हरियाणात भाजपची तर जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीची मुसंडी

तर भाजपच्या योगेश कुमार (Yogesh Kumar) यांना ५८ हजार ०६५ मते पडली. त्यामुळे फोगाटने ५ हजार ७६१ मतांनी दणदणीत विजय मिळवला. हरियाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघाची जागा राज्यात आधीपासूनच चर्चेत होती. या जागेवर काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगट यांना तिकीट देऊन भाजपला शह देण्यासाठी मोठी खेळी केली होती. त्याचवेळी दलित चेहरा असलेल्या कॅप्टन योगेश बैरागी यांना भाजपने तिकीट दिले होते. त्यामुळे ही जागा राज्यात चर्चेचा विषय बनली होती. अखेर या जागेवर विनेश फोगाटने बाजी मारली आहे.

हे देखील वाचा : Haryana Election Result 2024 : हरियाणात काँग्रेसची पिछेहाट; भाजपाने बहुमताचा आकडा केला पार

दरम्यान, हरियाणातील ९० जागांपैकी सध्या १० जागांचे निकाल (Result) जाहीर झाले असून ८० जागांचे निकाल येणे अद्याप बाकी आहेत. हरियाणात सध्या काँग्रेसने ७ जागांवर विजय मिळविला आहे. तर भाजपने तीन जागा जिंकल्या आहेत. तसेच इंडियन नॅशनल लोकदल १, बहुजन समाज पक्ष १ आणि अपक्ष उमेदवार तीन जागांवर आघाडीवर आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या