Monday, November 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजHaryana Elections Results 2024 : हरियाणात भाजपची निर्णायक आघाडी, पण काँग्रेसला भलतीच...

Haryana Elections Results 2024 : हरियाणात भाजपची निर्णायक आघाडी, पण काँग्रेसला भलतीच शंका; निवडणूक आयोगाकडे तक्रार

दिल्ली । Delhi

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलानुसार, हरियाणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत होतं, तर भाजप प्रचंड पिछाडीवर होतं. पण अचानका काही फेऱ्यानंतर काँग्रेस पिछाडीवर गेली आणि भाजपने निर्णायक आघाडी घेतली. अचानक झालेला हा उलटफेर काँग्रेससाठी धक्का मानला जाते आहे.

- Advertisement -

मात्र, या सगळ्या घडामोडी सुरु असताना काँग्रेस पक्षाचे (Congress) ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोग (Election Commission) मतमोजणीची ताजी आकडेवारी अपडेट करत नसल्यामुळेच भाजप (BJP) सध्या आघाडीवर दिसत आहे. हा भाजपचा माईंड गेम आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये, असे जयराम रमेश यांनी म्हटले.

आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आम्ही आता त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. आतापर्यंत मतमोजणीच्या 11 ते 12 फेऱ्या पार पडल्या आहेत. पण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चौथ्या आणि पाचव्या फेरीचे निकाल दाखवले जात आहेत. त्यामुळे भाजप आघाडीवर दिसत आहे. हा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रकार आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी हाच प्रकार घडला होता. निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम केले पाहिजे. स्थानिक यंत्रणांवर निवडणूक आयोगाने दबाव आणणे योग्य नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीन ते साडेतीन वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रांवर थांबून राहावे. खेळ अजून संपलेला नाही. भाजप मनोवैज्ञानिक खेळ खेळत आहे. हा भाजपचा माईंड गेम आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटले.

तर सुप्रिया श्रीनेत यांनीही काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. निवडणूक आयोगाने मतमोजणीची आकडेवारी बराचवेळ अपडेट केलेली नाही. आमच्याकडे ग्राऊंडवरुन येणाऱ्या माहितीनुसार काँग्रेसच्या बाजूने निकाल आहेत. अंतिम आकडेवारी येईल, तेव्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झालेले असेल, असे सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 2006 च्या दिव्यांग भरतीतील 70 शिक्षकांची मूळ फाईलच गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील 2006 मधील विशेष दिव्यांग शिक्षक भरतीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या भरतीशी संबंधित 70 शिक्षकांच्या मूळ...