Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशCongress Worker Murder: काँग्रेस कार्यकर्ता तरुणीची हत्या, सूटकेसमध्ये आढळला मृतदेह

Congress Worker Murder: काँग्रेस कार्यकर्ता तरुणीची हत्या, सूटकेसमध्ये आढळला मृतदेह

रोहतक । Rohtak

काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल ( Himani Narwal ) यांचा मृतदेह एका सूटकेसमध्ये आढळून आला आहे. हरियाणातल्या रोहतकमध्ये ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान पक्षाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

पोलिसांना घटनास्थळी सूटकेसमध्ये तरुणीच्या हातावर मेहेंदी, गळ्यात काळ्या रंगाची ओढणी, पांढऱ्या रंगाचं टॉप आणि लाल रंगाची पँट अशा अवस्थेत तरुणी आढळली. प्राथमिक अंदाजानुसार, तिची गळा आवळून हत्या करुन मृतदेह सूटकेसमध्ये टाकून फेकण्यात आला.

शनिवारी दुपारपर्यंत तरुणीची ओळख पटली नव्हती. मात्र काही वेळात तिचे फोटो समोर आल्यानंतर हरियाणातील रोहतकच्या आमदाक बीबी बत्रा यांनी तरुणीची ओळख पटवली. त्यांनी तरुणीचं नाव हिमानी नरवाल असल्याचं सांगितलं. ती काँग्रेसची सक्रिय कार्यकर्ता होती, काँग्रेस अनेक कार्यक्रमांमध्ये ती सहभागी असायची.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमानी हरियाणातील रोहतकमध्ये भाड्याच्या घरात राहत होती. तिच्या वडिलांचं अनेक वर्षांपूर्वी निधन झालं होतं. तिच्या वडिलांनी आत्महत्या केली अशी माहिती आहे. तर तिची आई दिल्लीत राहते. तिच्या एका भावाचीही हत्या केल्याचं बोललं जातं.

हिमानीच्या हत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तिची हत्या नेमकी कशामुळे झाली आणि हत्येमागे यामागे कोण आहे याचा तपास सुरू आहे. तिचा सक्रिय राजकीय सहभाग आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेली जवळीक लक्षात घेता या हत्येमागे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हे नियोजित हत्येचं प्रकरण असल्याचं कळतं आहे.

हिमानी नरवाल कोण होती?

सोनीपतमधील कथुरा गावातील रहिवासी हिमानी नरवाल ही काँग्रेस कार्यकर्ता होती. हिमानी नरवाल रोहतकचे खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्यासह अनेक नेत्यांच्या राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होत्या. त्या काँग्रेसच्या रॅली आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये हरियाणवी लोककलाकारांसोबत सादरीकरण करण्यासाठी ओळखल्या जात होत्या. एवढेच नाही तर भारत जोडे यात्रेदरम्यान हिमानी राहुल गांधींसोबतही दिसली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...