Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशHathras Gang Rape : 'एसआयटी'ला तपासासाठी योगी सरकारकडून मुदतवाढ

Hathras Gang Rape : ‘एसआयटी’ला तपासासाठी योगी सरकारकडून मुदतवाढ

दिल्ली | Delhi

उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘एसआयटी’ला आज आपला अहवाल सादर करायचा होता. पण एसआयटीला तपासासाठी दिलेला कालावधी दहा दिवसांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदेश देत वाढवला असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘एसआयटी’ला बुधवारी आपला रिपोर्ट दाखल करायचा होता. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदेश देत एसआयटीला तपासासाठी दिलेला कालावधी दहा दिवसांनी वाढवला आहे. उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी याबाबत पत्रकरांना माहिती दिली आहे.

तत्पूर्वी, उत्तर प्रदेशमधील सर्व स्त्रियांच्या सन्मान आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्‍चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की, भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिले जाईल. तुमचे उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे, असे ट्‌विट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या