Friday, May 31, 2024
HomeराजकीयHathras Gangrape : दोषींची शिक्षा भविष्यात उदाहरण सिद्ध होईल

Hathras Gangrape : दोषींची शिक्षा भविष्यात उदाहरण सिद्ध होईल

दिल्ली | Delhi

हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर त्या पीडितेचा मृत्यू झाल्याने देशभरातून, त्या नराधमांनी तात्काळ शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होत आहे. एका तरुणीवर सामुहिक बलात्कार करून तिच्यावर कुटूंबियांच्या परवानगीमुळे अत्यसंस्कार केल्यामुळे देशभरातून योगी सरकार आणि युपी पोलीसांविरोधात जनता संतप्त झाली आहे.याच पार्श्वभूमीवर योगींनी ट्विटरवरुन पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “उत्तर प्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिलं जाईल, तुमचे उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे.”

दरम्यान काल राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनादेखील पीडीतेच्या कुटुंबाला भेटण्यापासून रोखण्यात आले आहे. यावेळेस राहुल गांधींसोबत धक्काबुक्की झाली. आज असाच प्रकार तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्यांसोबतही झाला आहे.त्यामुळे अनेकजण पोलिस प्रशासन आणि सरकारकडे संशयाने पाहत आहेत.

मुंबई मध्येही शिवसेनाकडून चर्चगेट परिसरात हाथरस प्रकरणी निदर्शनं सुरू झाली आहेत. तर आज सकाळी एनसीपी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना जर योगी आदित्यनाथ सरकारला महिलांना सुरक्षा देणं शक्य होत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या