Monday, November 25, 2024
Homeधुळेमुख्य जलवाहिनीवर नळ कनेक्शन असणार्‍यास पाचपट पाणीपट्टी

मुख्य जलवाहिनीवर नळ कनेक्शन असणार्‍यास पाचपट पाणीपट्टी

धुळे dhule । प्रतिनिधी

मुख्य जलवाहिनीवर (main water pipe line) बेकादेशीर नळ कनेक्शन (Illegal tap connection) घेतलेल्या धारकांना पाचपट पाणीपट्टी (Fivefold water strip) आकारणी करण्याचा निर्णय विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठयावर नियोजन करण्यासाठी धुळे महापलिकेत (Dhule Municipality) महापौरांच्या (mayor) उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

- Advertisement -

जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ

सद्यःस्थितीत उन्हाळयाचे दिवस असल्याने व आवश्यक ते पाणी शहरास उपलब्ध होत नसल्याने पाणीपुरवठा नियोजनात विस्कळीतपणा निर्माण झालेला आहे. त्यामुळे शहरात विविध भागात आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. याबाबत निश्चित व ठोस उपाययोजना करण्यासाठी व सदर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन करण्यासाठी बैठक महापौर प्रतिभा चौधरी यांनी घेतली.

VISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस… करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटलVISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ?

उपलब्ध असलेले पाणी साठा शहरात वितरीत होणारे पाणी व त्याचे योग्य नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पाणी पुरवठयासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यासाठी शासनामार्फत प्रतिनियुक्तीवर दोन उप अभियंत्यासाठी संबंधित मंत्री महोदयांना समक्ष भेटून पत्र सादर करण्यात येणार आहे. तसेच दि.20 मे रोजी एमएसईबीचा शटडाऊन आहे. त्या एकाच दिवसात, तापी योजनेवरील सर्व गळतींची दुरुस्त करण्यात येणार आहे. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी शहर अभियंता यांच्या मार्फत संपूर्ण शहरातील गळतींची तपासणी करण्यात येऊन त्याबाबतही नियोजन करण्यात येणार आहे. मुख्य वितरण वाहिनीवर असलेल्या बेकादेशीर नळ कनेक्शनमुळे जलकुंभ भरण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे हनुमान टेकडी ते बडगुजर पाण्याची टाकी पर्यंतची मुख्य जलवाहिनीवरील बेकादेशीर नळ कनेक्शन धारकांवर पाचपट पाणीपट्टी आकारणी करण्यात येणार आहे.

VISUAL STORY : परिणीती चोप्राने केली नव्या आयुष्याची सुरूवात, भर कार्यक्रमातील ‘त्या’ कृतीने वेधलं लक्षकोण होणार अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती ?

सुकवद बाबळे तसेच इतर सर्व पाणीपुरवठा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, फ्लो मीटर्स सुरू करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. वारंवार होणार्‍या खंडीत विद्युत पुरवठयामुळे एमएसईबीला एक्सप्रेस फीडरची नोटीस द्यावी. व कंझूमर फोरममध्ये तक्रार करण्याबाबत कार्यवाही करावी, 21 तारखेपर्यंत प्रत्येक जलकुंभावरील वितरण वाहिन्यांचे नकाशे बनवून सादर करावे. व झोन तयार करावे, अमृत योजनेतील अंतर्गत तापी पाणीपुरवठा योजनेसाठी तीन नवीन पंप दाखल झालेले असून सदर पंप तातडीने कार्यन्वीत करावे, तसेच हनुमान टेकडीवरुन रामनगर जलकुंभ भरण्यासाठी मुख्य वितरण वाहिन्या असून यावर अनेक बेकायदेशीर नळ कनेक्शन असल्याने सदर मेन लाईन बंद करुन त्याऐवजी तापी पाणीपुरवठा योजनेवरुन रामनगर जलकुंभ भरण्यात यावे, उपायुक्तांनी दररोज पाच वाजता यावर माहिती मागून आढावा घेवून दैनंदिन अहवाल सादर करावा यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण मोटारसायकलला ट्रकची धडक : एक ठार

सदर कार्यवाही पुर्ण करण्यासाठी आठ दिवसाची मुदत देण्यात आलेली असून पुनश्च: पाणी वितरण व्यवस्था सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश महापौरांनी बैठकीत दिले. तसेच आठ दिवसानंतर पुनश्च: बैठक घेऊन या कामात हलगर्जी व दिरंगाई करणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांवर प्रतिदिन दंडात्मक कार्यावाही करावा अशी सुचना दिली.

या बैठकीस उपमहापौर नागसेन बोरसे, आयुक्त देविदास टेकाळे, अति.आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त विजय सनेर, वंदना भामरे, अभियंता कैलास शिंदे, सहाय्यक अभियंता एन. के. बागुल, सी.एम. उगले, पी. डी. चव्हाण उपस्थित होते.

सातपुडा भागात वन्य प्राण्यांची अवस्था बिकट

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या