Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाविजयानंतर ड्रेसिंगरुममध्ये काय म्हणाले रवी शास्त्री, पाहा व्हिडिओ

विजयानंतर ड्रेसिंगरुममध्ये काय म्हणाले रवी शास्त्री, पाहा व्हिडिओ

भारतीय संघाने चौथ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी ३२८ धावांचे लक्ष्य गाठत ऑस्ट्रेलियाच्या ‘गाबा’ मैदानावर पराभव केला. ३२ वर्षांनी गाबाच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा बुरुज ढासळला. या विजयानंतर रवी शास्त्री यांनी ड्रेसिंग रुममध्ये गेले आणि सहकाऱ्यांकडे मनोगत व्यक्त केले.

बीसीसीआयने रवी शास्त्री यांच्या भाषणाचा व्हिडिओ टि्वट केला आहे. आपल्या भाषणात रवी शास्त्री म्हणाले, “जे धाडस, जे धैर्य तुम्ही दाखवले, ते अवर्णनीय आहे. जखमा झेलल्या, संघ केवळ ३६ धावांत ऑलआऊट झाला. अशी बिकट स्थिती असूनही तुम्ही मागे वळून पाहिले नाहीत. स्वत:वर विश्वास दाखवला, त्याचेच हे फळ आहे. हा आत्मविश्वास रातोरात आला नाही. या आत्मविश्वासाने संघ नव्याने उभा राहिला. तुमचा खेळ तुम्ही दाखवला. त्यामुळे आज केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग तुम्हाला सॅल्युट करत आहे”

- Advertisement -

रिषभला तर तोड नाही

शास्त्री म्हणाले, “रिषभला तर तोड नाही. तू ज्याप्रकारे फलंदाजी केली, त्यावेळी काही क्षण अनेकांना हृदविकाराचे धक्के दिले. तुझ्यावर जी जबाबदारी होती ती तू भक्कमपणे निभावलीस” खेळाडूंचं कौतुक करुन झाल्यानंतर कोच रवी शास्त्रींनी मग आपला मोर्चा अजिंक्य रहाणेकडे वळवला. रवी शास्त्रींनी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्व कौशल्याचं तोंडभरुन कौतुक केलं.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या