Saturday, July 27, 2024
Homeनगरमाजी नगराध्यक्ष व त्याच्या मुलाकडून मुख्याध्यापकाला मारहाण

माजी नगराध्यक्ष व त्याच्या मुलाकडून मुख्याध्यापकाला मारहाण

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरातील ईदगाह मैदान येथे असलेल्या एका शाळेच्या मुख्याध्यापकाला एका माजी नगराध्यक्ष व त्याच्या मुलाने बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या नगराध्यक्ष पितापुत्रावर पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

शिक्षक हा समाजाला दिशा देणारा असतो. याच महिन्यात उत्साहात देशभरात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.आपल्या भारतीय संस्कृतीत आईवडिलांनंतर मुलांच्या जडणघडणीत शिक्षकाचा मोठा वाटा असतो. त्यामुळे शिक्षकाला समाजात एक महत्त्वाचे स्थान आहे. मात्र कोपरगाव शहरात विरुद्ध घडताना दिसत आहे. माजी नगराध्यक्ष व त्याच्या मुलाने एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकाला अज्ञात कारणावरून मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. सदर प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणामुळे शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या माजी नगराध्यक्ष व त्याच्या मुलावर पोलीस प्रशासन काय कारवाई करेल याकडे शिक्षक व शहरातील नागरिक लक्ष लावून आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या