Wednesday, June 19, 2024
Homeनगरआरोग्य विभागातील 11 हजार पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू

आरोग्य विभागातील 11 हजार पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास 11 हजार पदांसाठीची कालपासून ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लाखो इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. आरोग्य विभाग ग्रुप क आणि ग्रुप ड या दोन विविध जिल्ह्यांच्या जाहिराती काल मंगळवारी प्रसिद्ध झाल्या आहेत. या भरती अंतर्गत गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर गट ‘ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया काल 29 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजेपासून सुरु झाली आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या