Saturday, November 2, 2024
Homeब्लॉगआरोग्यमंत्र बागकामाचा

आरोग्यमंत्र बागकामाचा

शरीरातील अतिरिक्त चरबी घटवायची असेल तर बागकामासारखा सुंदर पर्याय नाही. बागकाम हे एखाद्यासाठी मन केंद्रीत करण्यासाठीचे साधन बनते तर एखाद्यासाठी ते आपल्यातील सृजनात्मकता दर्शवण्याचे माध्यम बनते. आणखी कोणासाठी हे वेळ घालवण्याचे सुंंदर साधनही बनते.

बागकामाची आणखी एक खासीयत म्हणजे, ते काम करताना कोणतेही अतिरिक्त श्रम न करता संपूर्ण शरीराला उत्तम व्यायाम मिळतो. हे काम करताना तुम्ही अप्रत्यक्षपणे स्ट्रेचिंग, वेटलिफ्टिंगसारखे व्यायाम करत असता. यासंदर्भात एक संशोधन करण्यात आले आहे. त्यानुसार सायकल चालवताना आपली जेवढी कॅलरी बर्न होते तेवढीच लॉनची सफाई करतानाही होते.

झाडांच्या फांद्या कापण्यासारखी कामे केल्यामुळेही बर्‍याच प्रमाणात कॅलरी बर्न होते. एरोबिक्स क्लासमध्ये घाम गाळून आपण जेवढी कॅलरी बर्न करतो तेवढीच कॅलरी मोठ्या झाडांच्या फांद्या कापणे किंवा लाकडे एकत्र करुन ठेवण्याच्या कामामुळे बर्न होते. एका संशोधनानुसार 30 मिनिट एरोबिक्स केल्याने जेवढी कॅलरी बर्न होते तेवढीच 45 मिनिटे बागकाम केल्याने होते.

- Advertisement -

इतर प्रकारचे व्यायाम केल्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रोल नियंत्रित राहण्यास मदत होते आणि हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात त्याचप्रमाणे बागकामानेही असाच फायदा होतो. शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढत असेल तर ती कमी करण्यासाठी बागकाम हा उत्तम पर्याय आहे. प्रौढ महिलांनी बागकाम केले तर त्यामुळे ऑस्टियोपोरोसिससारख्या आजारापासून दूर राहण्यास मदत होते. मग, आजच बागकाम सुरु करण्यास काय हरकत आहे?

स्वरदा वैद्य

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या