Thursday, May 2, 2024
Homeनगरआरोग्य यंत्रणेकडून सोनईत सर्व्हे व धूर फवारणी

आरोग्य यंत्रणेकडून सोनईत सर्व्हे व धूर फवारणी

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनईत दोन महिन्यापासून डेंग्यूसदृश आजाराने नागरिक हैराण झालेले होते. यातच एक 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेने व ग्रामपंचायतीने घरोघरी सर्वे व धुर फवारणीस सुरूवात केली.

- Advertisement -

सोनईत डेंग्यूने मुलीचा मृत्यू याविषयी वर्तमानपत्रात आलेल्या बातमीची दखल जिल्हा आरोग्य अधिकारी नागरगोजे यांनी घेऊन तातडीने जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. मोहन शिंदे, हिवताप अधिकारी डॉ. तन्मय कांते, डॉ. संजय सावंत यांच्यासह नेवासा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक डिंबर यांना सोनईत पुढील उपाययोजनेसाठी पाठवले

आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत घरोघरी डेंग्यूचे सर्व्हेक्षण सुरू करून कंटेनर सर्व्हेक्षणामध्ये डेंग्यू अळ्या आढळलेली भांडी रिकामी करून ती कोरडी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आशा कर्मचारी संपावर असल्याने मनुष्यबळाची अडचण ओळखून जिल्हा आरोग्य अधिकारी नागरगोजे यांनी तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपलब्ध करून दिल्याने 25 आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत 2750 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.

सर्व्हेमध्ये 201 घरातील पाणीसाठ्यात डास अळ्या आढळून आल्या. त्या पाण्यात डास अळी नाशक अबेट औषध टाकण्यात आले. सोनई ग्रामपंचायती कडुन चार धुर फवारणी मशीनच्या साह्याने गावात कीटकनाशक औषधी दूर फवारणी चालू करण्यात आली आहे. नागरीकांनी पाणी साठवण्याची भांडी कोरडी, स्वच्छ करावी, फ्रिज, कुलरमधील पाणी वेळोवेळी रिकामे करावे, परिसरात पाणी साठणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी दीपक डिंबर यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या