Saturday, May 9, 2026
HomeनगरAccident News : प्रमोशनचे पत्र आणण्यासाठी निघालेल्या आरोग्य सेवकाचा मृत्यू

Accident News : प्रमोशनचे पत्र आणण्यासाठी निघालेल्या आरोग्य सेवकाचा मृत्यू

कर्जत |तालुका प्रतिनिधी| Karjat

येथील आरोग्य सेवक संतोष कांतीलाल भैलुमे (वय 47) हे सोमवारी (दि.12) नगर-सोलापूर महामार्गाने दुचाकीवरून प्रमोशनचे पत्र आणण्यासाठी नगरकडे जात असताना घोगरगाव पुलाजवळ कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात संतोष यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष भैलुमे हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक म्हणून बनपिंपरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कार्यरत होते.

- Advertisement -

त्यांना पदोन्नती मिळाली म्हणून ते जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे पत्र आणण्यासाठी नगर-सोलापूर महामार्गावरून जात असताना घोगरगाव गावाजवळ असणार्‍या पुलाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने जोरदार धडक दिली. अपघात एवढा गंभीर होता की संतोष भैलुमे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये अतुल कांतिलाल भैलुमे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

निदा

Asaduddin Owaisi: सुक्षिशित मुस्लीम मुलामुलींना…;निदा खान प्रकरणावर असदुद्दीन ओवैसींचं भाष्य, म्हणाले,...

0
छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarनाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य महिला आरोपी असलेली निदा खान २७ दिवस फरार होती. अखेर तिला छत्रपती...