Saturday, May 4, 2024
Homeनाशिकहिवाळ्यातला आराेग्यदायी आहार..!

हिवाळ्यातला आराेग्यदायी आहार..!

नाशिक | Nashik

हिवाळा हा खरं तर उत्साहवर्धक ऋतू. या ऋतूत भूक वाढते, शरीराची क्षमता वाढते. पण त्यासाठी याेग्य आहार घेणे महत्वाचे आहे.

- Advertisement -

बाहेरील थंडीचा परिणाम शरीराच्या अंतर्गत अवयवांवर हाेऊ नये म्हणूण त्वतेची सुक्ष्म छिद्रे आकुंचन पावतात. त्यामुळे शरीरातील उष्णता आत काेंडली जाते आणि हीच उष्णता आधिक भूक लागण्याचे कारण ठरते.

या दिवसात मेथी, कारली, वांगी, सूर्यफुलाचे देठ शेवग्याच्या शेंगा आणि पाला व इतर भाज्या खाळ्यात.

मांसाहरी व्यक्तींनी रावस, पाॅपलेट हे मासे खावेत. ज्यांना घशांचे आजार व वारंवार सर्दी हाेते त्यांनी दही व ताकाचे कमी सेवन करावे. सकाळची सुरवात काेमट पाणी पिऊन करावी. या दिवसांमध्ये

भूक न मारता सात्विक आहार घ्यावा.

तीळ,,शेंगदाणे, गूळ, सुकामेवा यासारखे उषणता देणारे पदार्थ खावेत. बाजरीची भाकर, तूप याचा वापर करावा. माेहरीचे तेल, साेयाबीन, अक्राेड, जवसचेही सेवन करावे.

फळांसह माेड आलेल्या उसळीचा समावेश आवश्य करावा. मुगाचे कढण, नाचणीचे लाडू, खजूर, सरबत, बाजरीची खिचडी, मका, तांदळाची उकड, नाचणी आणि ज्वारीचे आंबिल, आवळा या पारंपारिक पदार्थांचा समावेश वाढवावा.

आहारात आंबवलेल्या पदार्थाचा किंवा आंबवण्याच्या प्रक्रियेला चालना देणाऱ्या पदार्थाचा योग्य प्रमाणात समावेश असणे आवश्यक आहे.

दही, ताक, सोयामिल्क, शेंगवर्गीय भाज्या, फळभाज्यांची लोणची यांसारख्या प्रोबायोटिक पदार्थाचा वापर करोमे महत्वाचे आहे. यामुळे शरीराला चांगले असणारे बॅक्टेरिया अनारोग्यदायी बॅक्टेरिया बाहेर ढकलण्याचं काम करतात.

हिवाळ्यात दिवसाचा कालावधी कमी तर रात्र मोठी असते. त्यामुळे शरीराला मिळणारे जीवनसत्त्वाचे प्रमाण घटते. शरीरातील हाडांना बळकटी देण्यासाठी ड जीवनसत्त्व महत्त्वाचे आहे.

पनीर, दही, चीज या पदार्थामुळे ‘ड’ जीवनसत्त्व शोषून घेण्याची क्रिया वेगवान होते. रावस, बांगडा, हेरिंग असे मासे आणि मशरूम, अंडी, संत्र्यांचा रस आणि दूध यामुळेही हे जीवनसत्त्व मिळते.

पाण्याची पातळी सांभाळा :

उन्हाळ्यामध्ये भरपूर घाम येऊन तहान लागत असल्याने पाणी पिण्याचे आठवण येतेच; पण हिवाळ्यामध्ये हवेतील बाष्प कमी झाल्याने आणि थंड वातावरणामुळे घाम येत नाही. थेट तुमच्या त्वचेतून पाणी शोषले जाते, त्यामुळे तुम्हाला घाम येत नसला तरीही तुमच्या शरीरात पाण्याची पातळी योग्यप्रमाणात राखणे महत्त्वाचे असते. हिवाळ्यात भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

उष्मांकाचा आहार आवश्यकच..

आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निराेगी पुरुषाची दिवसभरासाठी २११० कॅलरिज व ४२.९ ग्रॅम प्रथिने, निराेगी महिलेसाठी १६६० कॅलरिज व ३६.३ ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता आहे. हिवाळ्यात या उष्मांकाचा आहार घेणे आवश्यक ठरते.

-सुप्रिया गाेस्वामी-गाेसावी.

आहारतज्ज्ञ, शासकीय रूग्णालय, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या