Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशज्ञानवापी प्रकरणावरील सुनावणी पूर्ण; कोर्टाने 'ती' याचिका फेटाळली

ज्ञानवापी प्रकरणावरील सुनावणी पूर्ण; कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली

प्रयागराज | Prayagraj

वाराणसीतील शृंगार गौरी-ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) प्रकरणी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या कोर्टाने (Court) आज महत्वाचा निकाल दिला आहे….

- Advertisement -

ज्ञानवापी संकुलात असलेल्या शृंगार गौरीसह इतर धार्मिक स्थळांवर नियमित पूजा करण्यास परवानगी देण्याची मागणी हिंदू पक्षाकडून करण्यात आली होती. पण हे प्रकरण न्यायालयात टिकवून ठेवता येत नाही, असा युक्तिवाद करत मुस्लीम बाजूने ही याचिका रद्द करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणी न्यायालयाने आज निर्णय दिला. न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे की, या प्रकरणाची सुनावणी नागरी प्रक्रिया संहितेच्या आदेश 07 नियम 11 अंतर्गत होऊ शकते. त्यामुळे मुस्लीम पक्षाची मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे. आता पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान, ज्ञानवापी मंदिराची ही पायाभरणी आहे. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो.’ असे ज्ञानवापी मस्जीद प्रकरणातील याचिकाकर्ते सोहन लाल आर्य यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या