मुंबई | Mumbai
सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या (Shiv Sena and NCP) आमदारांच्या (MLA) अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे. याआधीच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना परखड शब्दांत फटकारले होते.अध्यक्षांनी सादर केलेल्या वेळापत्रकामुळे सुनावणी दीर्घकाळ लांबण्याची शक्यता असून त्यांनी सुधारित वेळापत्रक सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र, आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन यापूर्वी तयार केलेले वेळापत्रकच सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती समोर आली आहे…
Political Special : मनसेनेत बदलाचे वारे सुरू; निवडणुकांमध्ये पुन्हा चमत्काराची तयारी
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले असले तरी राहुल नार्वेकरांकडून सुनावणीचे जुनेच वेळापत्रक न्यायालयात सादर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर मध्ये सुट्ट्यांचे दिवस आल्यामुळे त्या सबबीखाली अध्यक्ष आधीचंच वेळापत्रक सादर करून त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभिप्राय अध्यक्ष घेऊ शकतात, असे सांगितले जात आहे. त्यासोबतच, विधानसभा अध्यक्षांकडून न्यायालयाकडून लेखी आदेशही मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्षांची बाजू सर्वोच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Tushar Mehta) हे मांडत आहेत
Dasara Melava : मोठी बातमी! ठाकरेंचा ‘शिवाजी पार्क’वर तर शिंदेंच्या शिवसेनेचा ‘या’ ठिकाणी होणार दसरा मेळावा
तसेच १३ ऑक्टोबर रोजी आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification Case) पहिली सुनावणी पार पडणार होती. त्यानंतर २० ऑक्टोबरला सर्व याचिका एकत्र करायच्या की, नाही याबाबत निर्णय घेणार होते. तर २३ ऑक्टोबरला क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू होणार होते. त्यानंतर २३ नोव्हेंबरनंतर पुढच्या तारखा जाहीर करू असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितलेले होते. मात्र गेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना तीव्र शब्दांत फटकारले आणि सुधारित वेळापत्रक दाखल करण्यास सांगितले होते. मात्र, आज पुन्हा विधानसभा अध्यक्ष तेच वेळापत्रक (Schedule) दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी पुन्हा लांबणीवर
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील आजच्या कामकाजानुसार दुपारी १२ किंवा एकच्या सुमारास शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणीतील दिरंगाईच्या प्रकरणाच्या याचिका सुनावणीसाठी घेतल्या जातील. न्यायालयाच्या वेळापत्रकामध्ये हे प्रकरण २४ व्या क्रमांकावर आहे. त्याआधी समलिंगी विवाहासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालय अंतिम आदेश देणार असून त्यानंतर वेळापत्रकानुसार इतर सुनावणी होतील.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Gopichand Padalkar : “महाराष्ट्रात जाती-जातीत भांडण लावणारा लांडगा कोण हे सगळ्या…”; गोपीचंद पडळकरांची पुन्हा पवार कुटुंबावर टीका