Friday, June 13, 2025
Homeदेश विदेशMLA disqualification : आमदार अपात्रतेची सुनावणी संपली, पुढची सुनावणी 'या' तारखेला होणार

MLA disqualification : आमदार अपात्रतेची सुनावणी संपली, पुढची सुनावणी ‘या’ तारखेला होणार

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आमदार अपात्रतेप्रकरणी 14 सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज (25 सप्टेंबर) विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली. या सुनावणीमध्ये वेळापत्रक निश्चित होणार असले, तरी ही प्रक्रिया यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणी यावर्षी निकाल लागणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.

आजच्या सुनावणीनंतर आता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, या संभाव्य वेळापत्रक पत्रकात कागदपत्र तपासणी, त्याचबरोबर साक्ष नोंदवणे, उलट तपासणी मुद्द्यांचा समावेश असल्याने या प्रक्रियेत तीन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन असल्याने त्या दरम्यानच्या कालावधीत सुनावणी होण्याची शक्यता धुसर असल्याने आता जानेवारी 2024 मध्ये निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने आमदार अपात्रतेवरील सुनावणीस उशीर होत असल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर एका याचिकेद्वारे उपस्थित करून विधानसभा अध्यक्षांना तातडीने सुनावणी घ्यायला सांगावे, अशी विनंती केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेच्या कारवाईच्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 14 सप्टेंबरला पहिली सुनावणी घेतली होती. आता आज दुसरी सुनावणी संपन्न झाली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

NCP Sharad Pawar : तुतारीला कमळाचे वावडे? भाजप सोडून कुणाशी युती...

0
मुंबई | Mumbai राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना गती मिळत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाने भारतीय जनता...