राज्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्रात ( Maharashtra State ) पुढील पाच दिवस म्हणजे महिना अखेरपर्यंत अवकाळी पावसाच्या वातावरणाचा (Rainy weather )कुठलाही धोका नसून ‘ ना पाऊस, ना गारपीट, ना पीक काढणीस धोका, मात्र उष्णतेत  वाढ  होणार आहे (The heat will increase ).असा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.

संपूर्ण विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणासह नंदुरबार जिल्ह्यातील शिरपूर,चोपडा,रावेर,यावल,जामोद, संग्रामपूर , ठाणे जिल्ह्यात मोखाडा, डहाणू ,तलासन, पालघर भागात महिना अखेरीस म्हणजेच दि.२८,२९,३० मार्च दरम्यान नवीन उष्णतेची लाट जाणवेल. त्यानंतर काहीसा दिलासा मिळू शकतो.

सध्या काढणीच्या जोमात असलेल्या कांदा, द्राक्षे, गहू, व आगाप उन्हाळ सोयाबीन व भाजीपाला पिकासाठी तसेच प्रक्रियेत असलेले बेदाणा निर्मितीस सध्या तरी पुढील आठवडाभर वातावरण पूर्णपणे सुरक्षित जाणवते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *