जळगाव । jalgaon
गेल्या दोन दिवसांपासून खान्देशात उष्णतेची लाट निर्माण झाली असून भुसावळचा पारा 45.8 पार गेला आहे. तर जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील अन्य शहरामध्येही उष्णतेची लाट निर्माण झालेली आहे. शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. आज तापमानाने उच्चांक गाठत 43.7 अंशाची मजल मारली आहे.
अती तापमानाने विज वापराचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे मात्र विजेचे लोडशेडींग पूर्व कल्पना न विज कंपनीने सुरू केले आहे. एन उन्हाळ्यात विजेचे लोडशेडींग दूपारीच 3 ते 5 दरम्यान होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
गेल्या सहा एप्रिल पासून तापमान 42 अंशावरच आहेत. आजचे तापमान 43.7 अंश आह. तशी नोंद ममुराबाद शासकीय हवामान केंद्राकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यात तापमानाची वाटचाल 45 अंशांकडे होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यंदाचा उन्हाळा कडक असेल, असे मागील महिन्यात जिल्हा प्रशासनाने सांगितले होते. हिट व्हेवमुळे नागरिकांना दक्षतेचा इशाराही देण्यात आला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तापमानाची वाटचाल तीव्रतेकडे होताना दिसते. सध्यस्थितीत जिल्ह्यात राजस्थान, मध्य प्रदेश या पश्चिमोत्तर भागातून उष्णवारे वाहत आहेत. कोरड्या वातावरणामुळे तप्त उन्हाच्या झळा अधिकच जाणवत आहेत. वातावरणातील आद्रतेचे प्रमाण आता कमी झाले आहे. उष्णलहरींमुळे तापमानाच्या पार्यात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.
घराबाहेर पडताना भरते धडकी
उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक सकाळीच घराबाहेर पडून बाराच्या आत बाहेरील कामे करून घेताना दिसतात. बाजारात जाणे, कार्यालयीन कामही त्याच वेळेत होत असल्याने दुपारी साडेबारापर्यंत बाजारात वर्दळ दिसते. दुपारनंतर मात्र, बाजारातील गर्दी काहीसी कमी झालेली दिसते. उन्हाचा तडाखा बघता दुपारच्या वेळेस घराबाहेर पडताना धडकी भरते.