मुंबई | Mumbai
हवामान विभागाने देशातील काही राज्यात उष्णतेची लाट पसरण्याचा धोका वर्तविला आहे. उत्तर भारत, मध्य भारतासह देशातील काही राज्यात येत्या काही दिवसात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
महाराष्ट्रातील अनेक शहरांचे तापमानाने चाळिशी पार केली आहे. काही ढगाळ वातावरण असतांना देखील प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून पारा ४० अंशावर चढला आहे.
Apple ची भारतात धमाकेदार एन्ट्री, मुंबईत उघडलं पहिलं स्टोअर… खासियत जाणून आवक् व्हाल
एप्रिल महिन्यांच्या सुरुवातीपासून विदर्भातील अनेक शहरांचे तापमान वाढत आहे. मागील सहा दिवसांपासून चंद्रपूरचे तापमान सतत वाढत आहे. सलग सहाव्या दिवशीसुद्धा चंद्रपूरच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. १२ एप्रिल रोजी ४२.२, १३ एप्रिल रोजी ४३.२, १४ एप्रिलला ४२.८ तर, १७ एप्रिलचे तापमानही उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
मुलाचा एन्काउंटर, बापाची खुलेआम हत्या! ४४ वर्षात उभारलेले अतिक अहमदचे साम्राज्य ५१ दिवसांत उद्धवस्त
तीव्र उष्णतेपासून वाचण्यासाठी जाणून घ्या उपाययोजना…
-
पाण्याअभावी उन्हाळ्यात अनेकदा डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. यामुळे अनेक जण विविध आजारांना बळी पडतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला उष्णतेपासून वाचवायचे असेल, तर स्वतःला पूर्णपणे हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. याशिवाय हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करा. याशिवाय लिंबू पाणी, लस्सी यांसारखी पेये प्या. गरज पडल्यास ORS घ्या.
-
उन्हाळ्यात होणार्या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उच्च प्रथिनेयुक्त अन्न खाणे टाळणे आवश्यक आहे. तसेच गरज नसल्यास दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत उन्हात बाहेर पडू नये. यासह पातळ, सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे घाला.
-
उष्मघातापासून वाचण्यासाठी अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये किंवा जास्त साखर असलेली पेये टाळा. याशिवाय उच्च प्रथिनेयुक्त अन्न आणि शिळे अन्न खाणे टाळावे.
-
उन्हाळ्यात आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मसालेदार अन्न खाणे टाळा. त्याऐवजी हंगामी फळ भाज्या, पालेभाज्या किंवा ताजी फळे आणि फळाच्या रसाचे सेवन करा, यासोबत दरवाजे आणि खिडक्याचे तोंड दरवाजाच्या दिशेने असल्यास त्या दिवसा बंद ठेवाव्यात आणि रात्री उघडा जेणेकरून ताजी हवा आत येऊ शकेल.
-
उन्हाळ्यात सुरक्षित राहण्यासाठी मांसाहार कमी करा. कारण उन्हाळ्यात मांसाहार पचण्यास बराच वेळ लागतो, ज्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. अन्न पचण्यास उशीर झाल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते.