Saturday, July 27, 2024
Homeनाशिकसांगा जगायचं कसं? अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

सांगा जगायचं कसं? अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

कवडदरा | वार्ताहर

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. हातचं पीक गेल्याने सांगा जगायचं कसं? असा प्रश्न विचारायची वेळी बळीराजावर आली आहे. उरलं सुरलेलं पीकही मातीमोल होत आहे…

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, बेलू, घोटीखुर्द परिसरात अवकाळी पावसाने झोडपले. कर्ज कसे फेडायचं? संसार कसा चालवायचा? असे प्रश्न आता शेतकऱ्यांना सतवतायेत. शासनाने पंचनामांच्या पलीकडे जाऊन मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

गावातील शेतकऱ्यांनी गहू, कांदा, आणि हरभऱ्याची लागवड केली होती. यातली सर्व पीक ही काढणीला आलेली. हातातोंडांशी आलेला हंगाम. पीक उमदे असल्याने दोन पैसे हाती शिल्लक राहतील अशी त्यांनी अपेक्षा बाळगली होती. मात्र अवघ्या 24 तासांतच त्यांच्या अपेक्षांना सुरुंग लागला.

गहू भुईसपाट झाला, कांदा छिनविच्छिन झाला, हरभरा मातीमोल झाला, अवघ्या काही काळ झालेल्या रंजक स्वप्न उद्धवस्त केलं. संपूर्ण क्षेत्राच नुकसान झालं. हाती काहीही लागणार नाही.. कर्ज कसं फेडावं? हा प्रश्न, घर कसं चालवावं? मुलांचे शिक्षण? आणि त्यात आजारपण आलं तर? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात काहूर माजवतायत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Dhulivandan 2023 : “दो घूँट मुझे भी पिला दे शराबी”…; मुंबई लोकलमधील Viral Video एकदा पाहाच

कांदा पिकाला फटका

अवघ्या काही दिवसांमध्ये कांदा काढला जाणार आणि तो बाजारात विकून कर्ज फेडणार. या विचारात शेतकरी होते. मात्र अचानक आलेल्या पावसाने त्यांच्या कांदा पिकाला झोडपून काढल. कांदा मातीमोल झाला. भिजलेला कांदा काढावा की शेतातच सडू द्यावा? असा प्रश्न त्यांना पडला आहे. काही रुपयांचं देखील उत्पन्न त्यांना मिळणार नाही. त्याच्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. असे अनेक शेतकरी आहेत, जे उध्वस्त झाले आहेत. पावसामुळे उध्वस्त झालेली पिकं मन सुन्न करीत आहेत. पंचांनाम्याचे सोस्कर उरकले जातं आहेत. मात्र प्रत्येक्षात संपूर्ण नुकसान भरपाई केव्हा मिळेल हा प्रश्न अनुत्तरित आहे.

रेल्वे इंजिनवर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

- Advertisment -

ताज्या बातम्या