Wednesday, July 24, 2024
HomeनाशिकNashik Rain News : नाशकात पावसाची तुफान हजेरी; नागरिकांची उडाली तारांबळ

Nashik Rain News : नाशकात पावसाची तुफान हजेरी; नागरिकांची उडाली तारांबळ

नाशिक | Nashik

- Advertisement -

दोन आठवड्यापूर्वी नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. तसेच या पावसामुळे शेतकऱ्यांना (Farmers) देखील काही प्रमाणात धीर मिळाला होता. यानंतर ग्रामीण भागात पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र, शहरात पाऊस उघडझाप पद्धतीने हजेरी लावत होता. त्यामुळे नागरिकांना काहीसा उन्हाचा चटका जाणवत होता.

Nashik Rain News : नाशकात पावसाची तुफान हजेरी; नागरिकांची उडाली तारांबळ

आज सकाळपासून शहरातील काही भागांत ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असल्याचे चित्र होते. तर काही भागांत उन्हाचे चटके जाणवत होते. यानंतर दुपारी एक वाजता ढग दाटून आले होते. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील एमजी रोड, शालीमार, सीबीएस यासह आदी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

Chandrashekhar Bawankule : “आपल्या विरोधात बातम्या येऊ म्हणून पत्रकारांना…”; बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

दरम्यान, हवामान विभागाकडून आज नाशिक जिल्ह्यात (Nashik Dsitrict Rain) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास पावसाने शहरातील काही भागांत तुफान हजेरी लावली. दुसरीकडे जिल्ह्यातील सटाणा बागलाण, येवला, नांदगाव, चांदवड, दिंडोरी, सिन्नर, देवळा, पेठ, त्र्यंबकेश्वर, निफाड या तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला आहे. तर काही भागात पाऊस सुरु असल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून अनेक धरणांतून विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना जीएसटी आयुक्तालयाचा दणका; वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

- Advertisment -

ताज्या बातम्या