Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik News: अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४०१४ हेक्टरवरील पिकांचं नुकसान; 'इतके' हजार शेतकरी बाधित

Nashik News: अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४०१४ हेक्टरवरील पिकांचं नुकसान; ‘इतके’ हजार शेतकरी बाधित

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ४० गावांमधील ४०१४.३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे सात हजार १०८ शेतकरी बाधित झाले आहेत. या बाधितांना नुकसानभरपाईसाठी तीन कोटी ८१ लाख ६७ हजार रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे.

मे महिन्याच्या मध्यापासून जिल्हयात पावसाला सुरूवात झाली आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे जिल्हयातील धरणे ही ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यातही गेल्या महिन्यात जिल्ह्यात सर्वदूर पावसाने धुमशान घातले. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीपिकांना बसला आहे. कांदा, सोयाबीन, मका यांसह फळपिकांना हानी पोहचली. जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाच्या मदतीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण केले.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यामध्ये चाळीस गावांमधील सात हजार १०८ हेक्टरचे नुकसान झाले आहे. या सर्व शेतकर्यांना नैसर्गिक संकटातून
बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तीन कोटी ८१ लाख ६७ हजार रुपयांच्या मागणी केली आहे. हे अनुदान लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आता बाधित शेतकर्यांकडून केली जात आहे.

YouTube video player

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
नाशिक जिल्ह्यात मे महिन्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्हयातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटला असून धरणे देखील ओव्हर फ्लो झाली आहेत. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात सातत्याने पाऊस होत असल्याने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकर्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे.

बाधित गावे बाधित शेतकरी बाधित क्षेत्र अंदाजे नुकसान
कोरडवाहू पिकाखालील क्षेत्र (हेक्टर)
१९ ६१०९ ३६३८.९१ ३०९.३१
१९ बागायत पिकाखालील क्षेत्र (हेक्टर)
१५ ८४८ २१९.८५ ३७.३७
बहुवार्षिक फळपिकांखालील क्षेत्र (हेक्टर)
०६ १५१ १५५.५० ३४.९९
एकूण
४० ७१०८ ४०१४.३२ ३८१.६७

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार?;...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही सर्वाधिक चर्चेची आणि लोकप्रिय ठरलेली योजना आहे. मात्र, आता ही योजना केवळ महिलांच्या...