Saturday, November 23, 2024
Homeदेश विदेशआंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये पावसाचा हाहाकार; ३१ जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यांना फटका

आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये पावसाचा हाहाकार; ३१ जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यांना फटका

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे आत्तापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. नद्या नाल्यांना पुर आला असून त्याचा फटका सुमारे साडे चार लाख लोकांना बसला आहे. राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने मदतकार्यास सुरुवात केली असून ३१,२३८ जणांना १६६ मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.

विजयवाडा, गुंटूर, कृष्णा, एलुरु, पायनाडू, बापटला आणि प्रकाशम या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या २० आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या १९ तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत. गुंटूर आणि एनटीआर जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार भारतीय नौदलाने आपत्तीग्रस्त भागात शोध आणि बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे; त्यापैकी एक आधीच विजयवाडा येथे आले आहे, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

- Advertisement -

तेलंगणात १६ तर आंध्र प्रदेशमध्ये १५ जणांचा पावसामुळे मृत्यू झाल्याचे समजते आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर गेल्या २४ तासापासून वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे विजयवाड्यात जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे.पुरामुळे इंटरनेट आणि मोबाईल टेलिफोन सेवा विस्कळीत झाली आहे. हैदराबादमधील कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला. विजयवाडा शहर आणि आसपासच्या भागात वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.

पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वसमावेशक अहवाल सरकार केंद्राला सादर करेल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, प्राथमिक अंदाजानुसार दीड लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने तातडीने दोन हजार कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी राज्य सरकारने केली. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूरग्रस्त भागाचा दौरा करून पूर ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याचे आवाहन केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या