Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून मुसळधार पावसाचा अंदाज

आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येत्या 2 दिवसात मान्सूनचा आस हिमालय पायथ्याकडून मूळ जागेवर सरकणे तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्मिती होवून वायव्येकडे भू- भागावर सरकणे या दोन प्रणालीमुळे मंगळवार दि.5 सप्टेंबरपासूनच पुढील 10 दिवस म्हणजे शुक्रवार दि 15 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात गडगडाटासह चांगल्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेचे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.

- Advertisement -

त्यातही विशेषतः मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील 18 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर मुंबईसह कोकण व विदर्भातील 18 जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे,असेही माणिकराव खुळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या