अकोले (प्रतिनिधी)
अकोले शहर व परिसरात दुपारी मुसळधार पावसास सुरुवात झाली आहे. या पावसाने काही वेळातच रस्त्यावर, शेतात पाणीच पाणी झाले.
- Advertisement -
यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाली. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली आहे.
आज दुपारी मुसळधार पाऊसास सुरुवात झाली. काही वेळेतच गटारी ओसंडून वाहू लागल्या. रस्त्यावर, शेतात, मैदानावर या पावसाने पाणीच पाणी साठले होते.
या जोरदार पावसामुळे वातावरणातील उकडा काहीसा कमी होऊन आल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे. तर जोरदार पावसामुळे छोटया-मोठ्या व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याची चित्र पाहावयास मिळत आहे.