Sunday, May 26, 2024
Homeजळगावचिनावल परिसरात अतिवृष्टी ; जनजीवन विस्कळीत

चिनावल परिसरात अतिवृष्टी ; जनजीवन विस्कळीत

चिनावल, ता.रावेर – वार्ताहर raver

आज दि.१९ जुलै रोजी सकाळ पासूननच सातपुड्यात तसेच कुभारखेडा, गौरखेडा, लोहारा, सावखेडा परिसरात जोरदार अतिवृष्टीच्या पावसामुळे चिनावल, कुभारखेडा अक्षरशः जलमय होवून दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले आहे.

- Advertisement -

तर अतिवृष्टी पावसामुळे चिनावल, खिरोदा, कुभारखेडा परिसरात खरिपाच्या हंगामासह, बागायती पिकांना मोठा फटका बसला आहे या मुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. चिनावल येथील सुमारे शेकडो हेक्टर जमीनीवर पाण्याचे तलाव साचले असून गावाच्या चारही बाजूने पाण्याने वेढा टाकल्याने संपूर्ण वाहतूक सह रहदारी मार्ग बंद पडला आहे यात ग्रमसथ, शेतकरी, विद्यार्थी यांची मोठी पंचाईत झाली होती. गावातील मुख्य रस्त्यावर पाण्याचा अति वेगाचा प्रवाह वाहत असल्याने प्रशासनाने दिला आहे तर पुढील काही तास ग्रामस्थांनी सावध राहण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या