Monday, July 1, 2024
Homeमुख्य बातम्यादिल्लीत मुसळधार पावसाने 88 वर्षांचा विक्रम मोडला

दिल्लीत मुसळधार पावसाने 88 वर्षांचा विक्रम मोडला

नवी दिल्ली । प्रतिनिधी New Delhi

- Advertisement -

यंदाच्या मान्सूनमधील पहिलाच पाऊस दिल्लीकरांसाठी अडचणीचा ठरला. शुक्रवारी सकाळी लोक घराबाहेर पडले तेव्हा पाण्याखाली गेलेले रस्ते पाहून आश्चर्यचकित झाले. पावसाचा जोर एवढा होता की त्यामुळे 88 वर्षे जुना रेकॉर्ड तुटला. मुसळधार पावसामुळे दिल्लीत जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. तसेच रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.

मध्यरात्रीतून झालेल्या काही तासांच्या पावसाने दिल्लीतील सांडपाणी व्यवस्थापनाचे (ड्रेनेज सिस्टीम) वाभाडे काढले. अनेक भागातील पाण्याने भरलेले भुयारीमार्ग (अंडरपास) भयावह होते. मिंटो रोडवर पावसाचे पाणी साचल्याने एक कार जवळपास पूर्णत: पाण्यात बुडाली होती. पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडली.

पावसामुळे इंदिरा गांधी विमानतळाच्या टर्मिनल-1 च्या छताचा काही भाग कोसळल्याने अनेक गाड्यांचा चक्काचूर झाला, 7 जखमी झाले तर त्यातील एकाचा मृत्यू झाला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत दिल्लीत 30 जून ते 2 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या