Sunday, September 8, 2024
Homeनाशिकइगतपुरी तालुक्यात धुव्वाधार पाऊस

इगतपुरी तालुक्यात धुव्वाधार पाऊस

२४ तासात २१७ मिमीची धुवाधार बरसात

- Advertisement -

जाकीर शेख | घोटी Ghoti

इगतपुरी तालुक्यासह व कसाराघाट व पाश्चिम घाट माथ्याच्या परिसरासह तालुक्यात गेल्या तीन -चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेसह झालेल्या मुसळधार पावसामुळे घोटी शहरासह व ग्रामीण भागासह पश्चिम जनजीवन विस्कळीत झाले आहे गेल्या २४ तासात पुंन्हा धुव्वाधार अशी डबल सेंच्युरी करत तबबल २१७ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे पावसाने इगतपुरी तालुक्यात पावसाच्या सरासरीने हजाराचा टप्पा पार केला आजपर्यंत १२१५ मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. या चार दिवसांच्या दमदार पावसाने धरणसाठ्यांमध्येही वाढ झाली आहे. यामध्ये भावली धरण जवळपास १०० टक्के भरले तर दारणा ८१ टक्के भरले आहे.दरम्यान तालुक्यातील भावली धरण परिसरा इगतपुरी परिसर, घोटी परिसर व दारणा धरण परिसरात धुवाधार पाऊस सुरू आहे.

धरणाच्या पातळीत विक्रमी वाढ :-
इगतपुरी तालुक्यातील सर्व धरणांनी उन्हाळयात शंभर टक्के तळ गाठला होता मात्र गेल्या चार दिवसांपासून सर्वत्र मुसळधारेसह संततधार कोसळत असलेलेया पावसामुळे धरणामध्ये कमालीची वाढ़ झाली आहे दारणा व भावली धरणात अनुक्रमे १०० टक्के वाढ झाली आहे पावसामुळे आज अखेर दारणा धरण ८१ टक्के ,भावली, १००,कडवा ८१. ५८ मुकणे,२७. ७८. ,तर वाकी ३२.२० व भाम ९० टक्के भरले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या