मनमाड | प्रतिनिधी Manmad
शहर परिसरासह ग्रामीण भागात आज(शुक्रवार) अवकाळी पावसाचे रात्री 8 वाजता जोरदार आगमन झाले. विजांचा कडकडाट आणि मेघ गर्जना करत तब्बल एक तासा पेक्षा जास्त वेळ मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपन काढले.जोरदार पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले तर सर्वच रस्त्याना नदीचे स्वरूप आले होत.
अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.या आठवड्यात तिसऱ्यांदा पावसाळ्या पेक्षा जास्त अवकाळी पाऊस उन्हाळ्यात झाला असून पावसामुळे तापमांनात मोठी घट झाली असल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.अवकाळी पावसाचा फटका नुकताच उघड्यावर काढून ठेवलेल्या कांद्याला बसला असून सर्वात जास्त नुकसान आंबे बागांचे झाले त्यामुळे वारंवार आणि वेळीअवेळी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा मेटकुटीला आला आहे.
हवामांन विभागाने पावसाचा दिलेला अंदाज खरा ठरत आहे सोमवार पासून आज शुक्रवार पर्यत अवकाळी पावसाने शहर परिसरात जोरदार हजेरी लावली. आज सकाळ पासून कडक ऊन पडलेला होता दुपार नंतर आकाशात काळे ढग दाटून आले होते रात्री 8 वाजता पाऊस सुरु झाला. सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी पडल्या मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि पाहता पाहता विजांचा कडकडाट करत तब्बल एक तासा पेक्षा जास्त वेळ मुसळधार पावसाने झोडपून काढले.
पावसाचा जोर इतका होता की शहरातील वेगवेगळ्या सखल भागात पाणी साचले. नगर परिषदेच्या मुख्य गेट समोर मोठ्या प्रमाणात जल जमाव झाला होता. सर्वच रस्त्यावरून इतके पाणी वाहत होते की त्यांना नदीचे स्वरूप आले होते.गटारी देखील तुडुंब वाहत होत्या त्यामुळे त्यात साचलेली घाण वाहून गेली. मे महिन्यात चक्क तीन वेळा पावसाळ्या सारखा जोरदार पाऊस होत असल्यामुळे सर्वाना आश्चर्यचा सुखद धक्का बसला.
मार्च महिन्या पासून सूर्य आग ओकत होता त्यामुळे तापमानात मोठी वाढ होऊन पारा 40 अंशा पर्यत गेला होता त्यामुळे प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले होते शिवाय जंगलातील नदी, नाले, ओढे कोरडे पडलेले आहे त्यामुळे वन्य प्राण्यांच्या जीवावर बेतत होते मात्र या आठवड्यात तीन वेळा दमदार पाऊस झाल्यामुळे तापमानात घट होऊन पारा 30 अंशा पर्यत आला त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून अनेक जंगलात देखील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पशु,पक्ष्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे दुसरीकडे मात्र अवकाळी पावसामुळे खळ्यावर काढून ठेवलेला कांदा भिजून खराब झाला असून कांदा बियांचे देखील नुकसान झाले सर्वात जास्त फटका आंबे बागाना बसला असून झाडावरून आंबे आणि कैऱ्या गळून पडू लागले त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे