Saturday, March 29, 2025
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्हयात जोरदार वादळी पाऊस

नंदुरबार जिल्हयात जोरदार वादळी पाऊस

नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी-

नंदुरबार शहरासह जिल्हयात आज सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या सुमारास वादळी वारा (stormy wind,), वीजांच्या कडकडाटासह (lightning strikes) जोरदार अवकाळी (Heavy unseasonal rain) पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील गहू, हरभरा, बाजरी, केळी, पपई, कांदा आदी पिकांचे (Damage to crops) मोठया प्रमाणावर नुकसान झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे मिरची पथार्‍यावर पसरविण्यात आलेल्या मिरच्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. वादळी पावसामुळे जिल्हयात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीज ताराही तुटल्या आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

- Advertisement -

गेल्याच आठवडयात भारतीय हवामान खात्याने नंदुरबार जिल्हयात दि. 4 ते 8 मार्चदरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला होता. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली होती. आज सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या सुमारास शहरासह जिल्हयात सर्वत्र वीजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार वादळी पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतातील उभ्या पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, बाजरी, ऊस, केळी, पपई, कांदा व इतर भाजीपालावर्गीय पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले.

दरम्यान, आज होळीचा सण असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. परंतू सायंकाळी आलेल्य अवकाळी पावसामुळे होळीच्या आनंदात विरजण पडले. आहे. जिल्हयात आदिवासी बांधवांचा होळी हा मुख्य सण असतो. या सणाची आदिवासी बांधव वर्षभर वाट पाहत असतो. मात्र, आज सातपुडा पर्वतात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने होळीच्या आनंदात विरजण पडले. आदिवासी बांधव आपल्या पारंपारिक पेहराव करुन होळीच्या सणात सहभागी झाले होते. पारंपारिक वेशभुषा आणि वाद्यांसह होळीसाठी सज्ज झाले होते. परंतू पावसामुळे होळीवर परिणाम जाणवू लागला आहे.

दरम्यान, वादळी पावसामुळे जिल्हयात काही ठिकाणी घरांची छपरे उडाली असून घरांची पडझड झाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर अनेक ठिकाणी वीज तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नागरिकांची मोठया प्रमाणावर गैरसोय झाली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २९ मार्च २०२५ – वल्लीमध्ये जीवन। नाना फळीफुली जीवन।

0
वसुंधरेच्या जीवसृष्टीतील झाडांचे महत्त्व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मानवी मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. झाडे तोडणे मानवी हत्येपेक्षाही गंभीर आहे अशी टिप्पणी केली आहे....