Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik Rain News : जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; बळीराजाला दिलासा

Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; बळीराजाला दिलासा

नाशिक | Nashik

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाने (Rain) दडी मारल्याने शेतकरी (Farmer) चिंतेत सापडला होता. तसेच खरीप हंगामातील (Kharif Season) पिके (Crops) करपू लागल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यामुळे पाऊस पुन्हा कधी कोसळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. त्यानंतर काल रात्रीपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे…

- Advertisement -

Maratha Andolan : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढला तीन पानी जीआर; मनोज जरांगेंना केली ‘ही’ विनंती

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, कळवण, सटाणा, इगतपुरी, देवळा, मालेगाव, मनमाड या तालुक्यांत काल रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात (Trimbakeshwar and Igatpuri Taluka) पावसाने रात्री आणि दुपारी जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी (Farmer) वर्गात समाधानाचे वातावरण पसरले असून भात पिकांना (Rice Crops) संजीवनी मिळाली आहे. तर सटाणा तालुक्यात (Satana Taluka) बऱ्यापैकी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना व विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर मनमाड शहरात देखील चांगला पाऊस झाला असून असाच पाऊस सतत आठ ते दहा दिवस सुरु राहिल्यास येथील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल.

Pankaja Munde : “कोणीतरी घोषणा करून…”; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

तसेच कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) अभोणा आणि निवाणे या परिसरात चांगला पाऊस झाल्याने दुष्काळामुळे उन्हाळ कांद्याचे पीक यावर्षी घेता येणार का नाही म्हणून चिंतेत असणाऱ्या उन्हाळा कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. तर देवळा तालुक्यात दोन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पावसाने हजेरी लावल्यानंतर आता येथील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. याशिवाय मालेगाव तालुक्यातील (Malegaon Taluka) झोडगेसह माळमाथा परीसरात दोन महिन्यांनंतर पावसाचे आगमन झाले. मात्र, कपाशीसह इतर पीकांची वाढ खुंटल्याने आता रब्बी हंगामासाठी येथील शेतकऱ्यांना दमदार पाऊसाची प्रतिक्षा आहे.

Video : ‘आदित्य एल १’ ने काढला पहिला सेल्फी; पृथ्वी अन् चंद्राचेही पाठवले फोटो

दरम्यान, नाशिक शहरातील विविध भागांमध्ये देखील काल रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे नाशिककरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. त्यानंतर शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर दुपारच्या सुमारास रिमझिम पाऊस देखील बरसला. तसेच नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये (Dam) गेल्यावर्षी पेक्षा यंदा २५ टक्के कमी म्हणजेच ५९ टक्के पाणीसाठा होता. तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) ८३ टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर आता रात्रभर नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागांत कोसळलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Maratha Andolan : “सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो पण…”; मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

- Advertisment -

ताज्या बातम्या