Saturday, June 15, 2024
Homeनाशिकपिंपळगाव बसवंतला पावसाची जोरदार हजेरी

पिंपळगाव बसवंतला पावसाची जोरदार हजेरी

शाळा, कांदाशेडचे पत्रे उडाले

पिंपळगाव बसवंत | वार्ताहर pimpalgaon Basvant

- Advertisement -

पिंपळगाव बसवंत परिसरात वादळी वार्‍यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील जिल्हा परिषद शाळेचे तसेच बसस्टँडलगतची दुकाने व अनेक कांदा शेडचे पत्रे उडाले. तर अनेक ठिकाणी झाडे पडली. तसेच झाडे अंगावर कोसळल्याने काहीजण जखमी झाले होते.

शहरातील उंबरखेड रोड परिसरातील झोपडपट्टीत 132 केव्ही वीज वाहिनीवर झाड पडल्याने आग लागली होती. पिंपळगाव अग्निशमन दलाचे बंब वेळेत घटनास्थळी पोहचल्याने आग आटोक्यात आली. त्यामुळे काही जीवितहानी झाली नाही. गंगामाई भुईकाटा येथे कांदा शेड पडल्याने तिघे जखमी झाले असून अन्य दोन ठिकाणी कांदा शेड खाली दोघे दबून जखमी झाले आहे . अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या