Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वीज पडून गाय ठार

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वीज पडून गाय ठार

रस्त्यावर झाडे पडल्याने काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत

- Advertisement -

बाऱ्हे | वार्ताहर Barhe / Surgana

YouTube video player

शनिवारी सायंकाळी सात वाजेपासून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने भातशेती सह वीज, रस्ता, जनावरे आदींचे अतोनात नुकसान झाले आहे. रविवारी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास खुंटविहीर जवळील गोणदगड शेतकरी तुषार शंकर गवळी यांच्या सागायदेवी माळावरील शेतामध्ये झापात बांधलेले गायीवर वीज पडल्याने गाय ठार झाली आहे.पशुधन वैद्यकीय पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे.

तालुक्यात जोरदार अतिवृष्टी होत असल्याने गिरणा, नार,पार,वाझडी,औरंगा,तान, मान, कावेरी, भुतकुड्याचा ओहोळ, अंबिकेची उपनदी कुंभारचोंड या नद्यांना पुर आला असून धोक्याची पातळीवर ओलांडून वाहत आहेत. जाहुले ते गांडोळे नाशिकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनातर्फे रस्ता मोकळा करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू होते.पिंपळसोंड तातापाणी येथील अंबिकेची उपनदी कुंभारचोंड, भुतकुड्याचा ओहोळ नदीवरील पाईपची मोरी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पिंपळसोंड गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.

पिंपळसोंड येथे रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने सात ते आठ वीजेचे पोल पडले आहेत. काहींच्या घरावर पोल मोडून पडल्याने थोडे फार नुकसान झाले आहे. जायविहीर येथे विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा बंद झाला आहे.

शासकीय आश्रम शाळा आंबेपाडा हस्ते येथे शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जोरदार वादळामुळे निलगिरीचे झाड मेन लाईनवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. भाटविहीर ट्रान्सफॉर्मर ते आंब्याचापाडा, वांजुळपाडा जाणारी वीज वाहिनी तारा तुटल्याने वीज पुरवठा बंद झाला आहे. दोन दिवसांपासून उंबरठाण, रघतविहीर, मांधा, बर्डीपाडा, खुंटविहीर, पिंपळसोंड, सोनगीर, गोणदगड हि सीमावर्ती भागातील गावे अंधारात चाचपडत आहेत.

वीज वितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत चालू करण्याचा प्रयत्न करत आहेत.संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे भातपिके धोक्यात आली असल्याने. भात उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तहसिलदार रामजी राठोड यांनी सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालय सोडू नये असे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून सात वर्षीय मुलाचा मृत्यू

0
इंदिरा नगर | प्रतिनिधी Indira Nagar प्रभाग क्रमांक 31 मधील पाथर्डी फाटा, नरहरी नगर येथे रविवारी सायंकाळी 7 वर्षाचा मुलगा इमारतीच्या गॅलरीतून चौथ्या मजल्यावरून पडल्याने...