धुळे – dhule
- Advertisement -
शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस (Heavy rain) सुरू आहे. तर काल सायंकाळी व रात्री देखील शहरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील देवपूरासह (Devpur) अनेक भागांमध्ये पाणीच पाणी झाले आहे.
पांझरा नदीसह (Panzra River) नाल्यांना देखील पूर आलेला आहे.
अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर देवपुरातील लाला सरदार हायस्कूल जवळ सुशीनाला काठावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
पहाटेच्या वेळी ही स्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती.दरम्यान आता परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली असून पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.