Sunday, March 30, 2025
HomeनाशिकRain News : त्र्यंबकेश्वरला पावसाची जोरदार हजेरी; रस्त्यांवर पाणीच पाणी

Rain News : त्र्यंबकेश्वरला पावसाची जोरदार हजेरी; रस्त्यांवर पाणीच पाणी

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

काल रात्रीपासून त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे धो-धो पाऊस (Rain) बरसत असल्याने नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. तर त्र्यंबकेश्वरमधील काही रस्त्यावर (Road) मोठ्या प्रमाणावर पाणी (Water) साचल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Accident News : कसारा घाटात कंटेनरची सहा ते सात वाहनांना धडक

त्र्यंबकेश्वर शहरात (Trimbakeshwar City) ब्रम्हगिरीकडून येणारे पाणी गंगासागर तलावात न जाता रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. भुयारी गटार योजनेचे काम करताना गंगासागरमध्ये जेथे पाणी जाते त्या ठिकाणी योग्य ती दक्षता न घेतल्याने सर्व पाणी रस्त्यावर आल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

हे देखील वाचा : Hiraman Khoskar : “मी पक्षाशी कुठलीही गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा” – आमदार खोसकर

दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथे मुसळधार पाऊस कोसळत असल्याने येथील पहिने आणि दुगारवाडी धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी वाढताना दिसत आहे. तसेच या मुसळधार पावसामुळे ब्रह्मगिरी पर्वतावर (Brahmagiri Mountain) धबधबे देखील वाहू लागले आहेत. तर दुसरीकडे हवामान विभागाने (IMD) नाशिक जिल्ह्यात शनिवार (दि.२० जुलै) पर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध तर काहींचा...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi येथील साईबाबांच्या मुळ चर्म पादुका साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 10 एप्रिलपासून दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात पादुका दोन...