येवला | प्रतिनिधी Yeola
- Advertisement -
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात आज, रविवारी (दि. १८) दुपारी व सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात झालेल्या पावसाने पाणीच पाणी झाले. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने वाहन चालकासह पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली.
सावरगाव, ठाणगाव, पाटोदा, विखडणी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब, झाडे उन्मळून पडले. अनेक ठिकाणी घराचे कौल व पत्रे उडाले. झाडे पडल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. ठाणगाव – कानडी रस्ताही बंद झाला होता.