मुंबई | Mumbai
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये (District) पावसाचा जोर ओसरल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण असून पाऊस (Rain) कोसळत नसल्याचे दिसत आहे. अशातच आता हवामान विभागाने महाराष्ट्रातील (Maharashtra) काही जिल्ह्यांत पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे…
Coal Scam : कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी कॉंग्रेसच्या माजी खासदारासह सहा जण दोषी
याबाबत हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ ते ४ तासांत महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यात (Jalgaon and Dhule Districts) काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
Cabinet Expansion : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर; खातेवाटपाचा तिढा लवकरच सुटणार
तर ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून रत्नागिरी, पालघर, रायगड, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) घाट भागात काही ठिकाणी पुढील तीन ते चार तासात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
नवाब मलिक यांना हायकोर्टाचा झटका ; ‘त्या’ प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळला
तसेच हवामान विभागाकडून मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे, सातारा, सांगली, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज म्हणजेच १३ जुलै रोजी पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.