Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबारफेस येथे वादळी पाऊस, वीज पडून शेत रखवालदार ठार

फेस येथे वादळी पाऊस, वीज पडून शेत रखवालदार ठार

शहादा | Sahada | ता. प्र.

तालुक्यातील फेस (Face) ते दोंदवाडा शिवारात आज सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह (Lightning strikes) झालेल्या वादळी पावसात (stormy rain) शेतात वीज पडून (Lightning strikes the field) एक जण जागीच ठार (One was killed on the spot) तर दुसरा जखमी (another was injured) झाल्याची घटना घडली. जखमीला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ (treatment at District Hospital)दाखल करण्यात आले.

- Advertisement -

परिसरात आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह (Lightning strikes) जोरदार पाऊस झाला. त्यात फेस (ता. शहादा) गावालगत असलेल्या दोंडवाडा शिवारात शेतात रखवालदारी करणाऱ्या सायसिंग केचका वळवी (वय २५) हा वीज कोसळून (Lightning strikes the field) जागीच ठार (killed on the spot) झाला.

तर ईश्वर नथू चौधरी हा गंभीर जखमी झाला. जखमी चौधरी यांना ग्रामस्थांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना घटनास्थळी जाऊन घटनेच्या पंचनाम्याचे आदेश दिले. मयताच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या