Monday, May 27, 2024
Homeधुळेबोराडी परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस

बोराडी परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस

बोराडी – Boradi – वार्ताहर :

बोराडी परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

चाकडू परिसरात गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वादळी वारे व मेघगर्जनेसह सुमारे एक तास जोरदार पाऊस झाला.

त्यामुळे येथील अनेक घरांच्या छताचे सर्व पत्रे उडून गेले. तसेच कौले तुटून पडले आहेत. त्यामुळे घरातील सदस्यांना बाहेर मोकळ्या परिसरात रात्र काढली लागली. स्वच्छतागृहाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सोबतच घरातील टीव्ही संचामध्ये पावसाचे पाणी गेल्याने त्यांचेही नुकसान झाले. घरातील साहित्य भिजले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली. नुकसानीचीचे पंचनामे त्वरित करावे, अशी मागणी होत आहे.

वार्‍याचा जोर अधिक असल्याने गावातील काही घराजवळ शेजारी उभे असलेले झाडे कोसळले.असून यात मोठया प्रमाणात नुकसान झाले. विजेच्या खांबावरील विज वाहिन्या तुटून पडल्या. यावेळी वीजपुरवठा खंडित असल्यामुळे अनर्थ टळला.

पावसामुळे ज्वारी, बाजरी, कपाशी या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने त्वरित घरांचे तसेच शेतीचे पंचनामे करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या