Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedVisual Story : आसाममध्ये हाहाकार; अंगाचा थरकाप उडवणारे फोटो आले समोर

Visual Story : आसाममध्ये हाहाकार; अंगाचा थरकाप उडवणारे फोटो आले समोर

आसाममध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या माहितीनुसार दिमा हासाओ जिल्ह्यात दरड कोसल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे…

काही भागात भूस्खलन झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वेचा संपर्क तुटला आहे.

- Advertisement -

मुसळधार पाऊस आणि पुरामुळे सिलचर-गुवाहाटी एक्स्प्रेस ट्रेन कचार भागात अडकली. परिस्थिती इतकी भयानक होती की ही ट्रेन अनेक तासांपासून अडकली होती. जिल्हा प्रशासनाने भारतीय हवाई दलाच्या मदतीने ११९ जणांची सुटका केली.

पूर आणि भूस्खलनामुळे अनेक रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. पाच जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून याचा फक्त सुमारे २५ हजारांहून अधिक लोकांना बसला आहे.

आसाममध्ये झालेल्या भूस्खलनात रेल्वेचा पूल वाहून गेला आहे. तसेच एका ठिकाणी रेल्वेचा पुलाचा भाग हवेत तरंगताना दिसून येत आहे. तसेच १४०० प्रवासी असलेल्या २ रेल्वे गाड्या पुरामुळे अडकल्या आहेत. या प्रवाशांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफ, आसाम रायफल्स, हवाई दल आणि स्थानिक नागरिक प्रयत्न करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या