Saturday, May 18, 2024
Homeनगरकोपरगावातील अजुनही अनेक शेतकऱी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून वंचीत

कोपरगावातील अजुनही अनेक शेतकऱी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून वंचीत

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव तालुक्यात मागील वर्षी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. शासनाने त्यासाठी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. त्यातील काही शेतकर्‍यांना त्याचा लाभही मिळाला तरी सुध्दा अजुनही अनेक शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचीत आहे. तरी नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील शेतकर्‍यांमधून होत आहे.

- Advertisement -

तालुक्यातील शेतकर्‍यांचे सोयाबीन, मका, ऊस, कांदा तसेच कपाशी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आगस्ट 22 मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा मिळावा म्हणून नुकसान भरपाई मिळावी ह्यासाठी निर्णय घेतला व पंचनामा करण्याचे आदेश दिले. सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे शंभर टक्के नुकसान झाले होते. काही नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पैसे मागच्या दोन महिन्यात जमा झाले.

परंतू अजुनही अनेक शेतकरी नुकसानभरपाई मिळण्यापासून वंचीत आहेत. खाते नंबर, आधारनंबर अनेक वेळेस देऊनही शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळलेली नाही. दोन वर्षापुर्वीही काही शेतकरी असेच नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचीत राहीले होते. त्यावेळी संबधीत कर्मचार्‍याची बदली झाल्याचे सांगुन त्या ठिकाणी दुसरा कर्मचारी आल्यावर अनुदान वर्ग करु असे तोंडी आश्वासन त्यावेळच्या संबधीत आधिकार्‍याने शेतकर्‍यांना दिले. मात्र शेवटी ते अनुदान शेतकर्‍यांना मिळालेच नाही. आता पण तसे होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करुन राहिलेल्या शेतकर्‍यांची नुकसान भरपाईची रक्कम खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. वेळेत ही नुकसान भरपाई मिळाली नाहीतर शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या